दिल्लीतील दुर्घटनेनंतर अग्नी सुरक्षेची झाडाझडती; अंधेरीतील चार हॉटेल व बारवर जप्तीची कारवाई

दिल्लीत नुकतीच एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत २५ हून अधिक जणांचा नाहक जीव गेला. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील घटनेनंतर मुंबईतील अग्नी सुरक्षेची झाडाझडती घेतली जाणार असून, सर्व उपाहारगृह (हॉटेल) परिसरातील अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरुपी सुस्थितीत व कार्यरत ठेवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
दिल्लीतील दुर्घटनेनंतर अग्नी सुरक्षेची झाडाझडती; अंधेरीतील चार हॉटेल व बारवर जप्तीची कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : दिल्लीत नुकतीच एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत २५ हून अधिक जणांचा नाहक जीव गेला. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील घटनेनंतर मुंबईतील अग्नी सुरक्षेची झाडाझडती घेतली जाणार असून, सर्व उपाहारगृह (हॉटेल) परिसरातील अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरुपी सुस्थितीत व कार्यरत ठेवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. तसेच २० जूनपर्यंत मुंबई अग्निशमन दलाकडून विविध विभागांच्या सहकार्याने विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे अंधेरी (पश्चिम) येथील वॉकमन बार, बोरा बोरा, चायना गेट, कारवन सेराई व होमटाऊन या हॉटेल आणि बारवर निष्कासन व जप्तीची कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रविंद्र आंबुलगेकर यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई क्षेत्रात विविध अग्निशमनविषयक उपाययोजना केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर, उपाहारगृहांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच, विशेष संयुक्त तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

नियमांचे काटेकोरपणे पालन करा!

अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन हे सामाजिक उत्तरदायित्व आहे. त्यामुळे, अग्निसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून सर्व संबंधित घटकांना करण्यात आले आहे.

१७व्यावसायिक, ४ कुकिंग रेज जप्त

अंधेरी (पश्चिम) येथील वॉकमन बार, बोरा बोरा, चायना गेट, कारवन सेराई व होमटाऊन या हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली. नियमांनुसार राखीव असलेल्या अनिवार्य खुल्या जागेचा वापर या आस्थापनांकडून स्वयंपाकघर व सेवा क्षेत्रासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर खुल्या जागेवरील अनधिकृत आच्छादन व बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच, १७ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर, १ नायट्रोजन गॅस सिलिंडर, १ गॅस बैंक, ४ कुकिंग रेंज तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन जप्त करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in