मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)ANI

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर येत्या रविवारी १९ मे रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या १५ मिनिटे उशिराने धावतील. ठाणे पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

- हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या कालावधीतल ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाऊन हार्बर लाईनवर

ब्लॉकपूर्वीची शेवटची पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल जी पनवेल येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल जी पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल.

logo
marathi.freepressjournal.in