मध्य रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल; भायखळा-वडाळा स्थानकात तुफान गर्दी अनेक लोकल परळ, दादरपर्यंतच धावल्या
तेजस वाघमारे/मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
(सीएसएमटी) रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकने मुंबईकरांचे शनिवारी प्रचंड हाल झाले. मुख्य मार्गावरील लोकल पायखळा स्थानक आणि हार्बर मार्गावरील लोकल वडाळा स्थानकापर्यंत चालविण्यात आल्याने या दोन्ही स्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली होती. यातच ब्लॉक दरम्यान अनेक लोकल परळ, दादर स्थानकापर्यंतच चालविल्याने प्रवाशांना पुन्हा लोकल पकडण्यासाटी कसरत करावी लागली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकातील लॅटफॉर्म विस्तारीकरणसाठी शुक्रवार, ३० मे च्या मध्यरात्रीपासून ते २ जून दुपारी १२.३० पर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकचा शनिवारी महत्त्वाचा दिवस होता. या काम साठी र्सएसएमटी ते भायखळा, वडाळा ते सीएनएमटी दरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच शनिवारी लोकलच्या ५३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे चोत्रीस तास गजबजलेल्या सीएसएमटी स्थानकात शुकशुकाट पसरला होता.
ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रविवरच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल. ब्लॉक काव्यत प्रवाशांनी महत्त्वाच्या कामसाठी बाहेर पडावे किंवा घरून काम करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले होते. मात्र रोजीरोटीसाठी बहुतांश मुंबईकर घराबाहेर पडल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळपासूनच लोकल ३० मिनिटांहून अधिक वेळ विलंबाने धावत असल्याने लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून वहत हत्या. त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत मध्य रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होती. मात्र त्या लोकलही तुडुंब भरून येत असल्याने प्रवाशांना अनेक वेळ रेल्वे स्थानकांमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.
कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, कांजुरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि परळ या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यातच मध्य रेल्वेने अनेक लोकल भायखळा ऐवजी परळ आणि दादरपर्यंत चालविल्या. त्यामुळे ऐन उन्हाने हैराण झालेल्या मुंबईकर प्रवाशांच्या त्रासात मोठी भर पडली. त्यातच रेल्वे स्थानकांवरील इंडीकेटरवर सीएसएमटी दाखविण्यात येत होते. मात्र लोकल परळ किंवा दादरपर्यंत चालविण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लोकल कुठपर्यंत धावणार याची उद्घोषणा रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये करण्यात येत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पर्यटकांचे हाल
मेगाब्लॉकची माहिती मिळाल्याने चाकरमान्यांनी कामावर पोचण्यासाठी पर्यायी मार्ग निवडले. मात्र पर्यटनासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे शनिवारच्या ब्लॉकने हाल झाले. या ब्लॉकमुळे महिला आणि लहान मुलांची मोठी तारांबळ उडाली.
भायखळा, वडाळा प्रवाशांनी गजबजला
लोकल भायखळा आणि वडाळा स्थानकापर्यंत चलविण्यात येत असल्याचे दोन्ही स्थानकांचा परिसर प्रवाशांनी गजबजला होता. एस्टी, बेस्ट बस या स्थानकाजवळून चालविण्यात येत असल्याने बस पकडण्यासाठी प्रवाशांची धवपळ सुरू होती. बसला गदीं असल्याने अनेकांनी दरवाजाला लटकून प्रवास केला.
आज दुपारपर्यंत सीएसएमटी स्थानकात लोकल नाही
सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारीही दुपारी पर ३ वाजेपर्यंत भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळ ते नीएसएमटी दरम्यन लोकत चालविण्यात येणार नाही. यामुळे रविवारीही प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागणार आहे.