महिला टीसीवर हल्ल्याप्रकरणी प्रवासी महिलेवर गुन्हा

महिला टीसीने आरोपीला विरोध करताच तिने तिच्या हाताचा चावा घेतला.
महिला टीसीवर हल्ल्याप्रकरणी प्रवासी महिलेवर गुन्हा
Published on

मुंबई : महिला टीसीवर हल्ला केल्याप्रकरणी आरती सिंग (२५) या महिलेविरोधात वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरती सिंग ही नायगावला राहते. ती गृहिणी आहे. ती तिच्या मैत्रिणीसोबत एसी लोकल ट्रेनमधून जात होती. ती बोरिवलीला गाडीत चढली. महिला टीसी अतिरा केती हिने सिंग हिच्याकडे तिकीट मागितले. तेव्हा तिच्याकडे तिकीट नव्हते. तेव्हा टीसीने तिच्याकडे दंड भरायला सांगितला. मात्र तिने तो भरण्यास नकार देऊन मीरा रोड स्टेशनला उतरण्याचा प्रयत्न केला. महिला टीसीने आरोपीला विरोध करताच तिने तिच्या हाताचा चावा घेतला. याप्रकरणी टीसीने आरोपीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in