मध्य रेल्वेचा मुख्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेचा वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक

सिग्नल, रेल्वे रूळ आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. तर, पश्चिम रेल्वेने ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री...
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)ANI

मुंबई : सिग्नल, रेल्वे रूळ आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ते दुपारी ३ वाजून ५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. तर हार्बरच्या कुर्ला आणि वाशी मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हवालदिल झालेल्या प्रवाशांना रविवारीही हाल सहन करत प्रवास करावा लागणार आहे.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १० वाजून ३४ मिनीट ते दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १० वाजून १६ मिनिट ते दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत.

- ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

- डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची पनवेल लोकल असेल. ही लोकल सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी सुटणार आहे.

- ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल सीएसएमटी मुंबई येथून दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सुटणार आहे.

- अप हार्बर मार्गावर सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी पनवेल येथून सुटणार आहे.

- सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३ वाजून ४५ वाजता सुटणार आहे.

वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेने ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच १५/१६ जून रोजी वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर २३.३० ते ४.४५ तासांपर्यंत जंबो ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील गाड्या विरार आणि भाईंदर/बोरिवली स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक असणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in