Mumbai Local Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवरही १० तासांचा ब्लॉक

रविवारी (दि.२२) लोकलने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुख्य मार्गावर ब्लॉक कालावधीत मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी फास्ट सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. तर कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/सेमी जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकावर थांबतील आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम करण्यासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन स्लो मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला असून ब्लॉक कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री ११ लोकल आणि रविवारी ५४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसह इतर अनेक लोकल ट्रेनला विलंब आणि त्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in