मुंबई लोकल : उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगब्लॉक

ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहे. तसेच, बोरिवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.
मुंबई लोकल : उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगब्लॉक

मुंबईत उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रुझ मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र, उद्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर या मार्गावर मेगाब्लॉक नाही आहे.

उद्या मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी डाऊन जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गांवरील लोकल माहीम आणि सांताक्रुझ/अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहे. तसेच, बोरिवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in