Mumbai local : एसी लोकलवर समाजकंटकांकडून दगडफेक ;   सुदैवाने प्रवाशांना इजा नाही

Mumbai local : एसी लोकलवर समाजकंटकांकडून दगडफेक ; सुदैवाने प्रवाशांना इजा नाही

बोलिवली लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. मुंबई लोकलच्या एखाद्या मार्गावर मेगा ब्लॉक लावल्यास मुंबईकरांची तारांबळ उडते. याच मुंबईकरांची लाईफलाईन समजल्याजाणाऱ्या मुंबई लोकलवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही काहीही इजा झालेली नाही. बोलिवली लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

पश्चिम रेल्वे लाईनच्या चर्चगेट ते विरार या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर दगफेक झाल्याची घटना घडली. जेव्हा ही लोकल कांदिवली आणि बोरिवली स्थानकांमद्ये धाव होती. त्या दरम्यान ही दगडफेकीची घटना घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेत एसी लोकलच्या जवळपास पाच ते सहा खिडक्या फुटल्या असल्याची माहिती मिळाली आहे. सदैवाने प्रवाशांना कुठलीही इजा झालेली नाही. या एसी लोकलवर दगडफेक करणारे समाजकंटकांचा शोध लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in