प.रे.वर आजपासून सलग तीन दिवस ब्लॉक; चर्चगेटहून विरारसाठी शेवटची लोकल आज रात्री ११.५८ वाजता सुटणार

पश्चिम रेल्वे मार्गावर मेट्रो मार्गिका-९ चा गर्डर लाँच करण्यासाठी मीरा रोड आणि भाईंदर स्टेशनदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ७ जून, ८ जून आणि ९ जूनला रात्री ब्लॉक असेल. शनिवारी चर्चगेटहून विरारसाठी शेवटची लोकल रात्री ११ वाजून ५८ वाजता सुटणार आहे. शनिवारी रात्री १.४५ तासांचा तर रविवार आणि सोमवारचा रात्रीचा ब्लॉक १.१५ तासांचा घेण्यात येईल.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मेट्रो मार्गिका-९ चा गर्डर लाँच करण्यासाठी मीरा रोड आणि भाईंदर स्टेशनदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ७ जून, ८ जून आणि ९ जूनला रात्री ब्लॉक असेल. शनिवारी चर्चगेटहून विरारसाठी शेवटची लोकल रात्री ११ वाजून ५८ वाजता सुटणार आहे. शनिवारी रात्री १.४५ तासांचा तर रविवार आणि सोमवारचा रात्रीचा ब्लॉक १.१५ तासांचा घेण्यात येईल.

चर्चगेट, मुंबई सेंट्रल दरम्यानचा ब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, रविवारी ८ जून रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल गाड्या रद्द राहतील आणि काही चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या वांद्रे/दादर येथून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील.

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. घेण्यात आला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मुख्य मार्ग : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १.३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत अप मेल/एक्सप्रेस गाड्या जलद मार्गाने वळविण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in