Mumbai : लोकलमधील धक्कादायक प्रकार; दादर-मुलुंडदरम्यान लेडिज डब्यातील महिलेसमोर अश्लील चाळे; CCTV द्वारे आरोपीचा शोध सुरू

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दादर ते मुलुंड स्थानकांदरम्यान एका ३० वर्षीय प्रवासी महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. ती दादर स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात बसली होती. प्रवासादरम्यान ती मोबाईल पाहत असताना...
Mumbai : लोकलमधील धक्कादायक प्रकार; दादर-मुलुंडदरम्यान लेडिज डब्यातील महिलेसमोर अश्लील चाळे; CCTV द्वारे आरोपीचा शोध सुरू
Mumbai : लोकलमधील धक्कादायक प्रकार; दादर-मुलुंडदरम्यान लेडिज डब्यातील महिलेसमोर अश्लील चाळे; CCTV द्वारे आरोपीचा शोध सुरूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दादर ते मुलुंड स्थानकांदरम्यान एका ३० वर्षीय प्रवासी महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. लेडिज डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या या महिलेकडे बघून अश्लील चाळे केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरूवारी दिली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

तक्रारीनंतर विनयभंगाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल

तक्रारदार महिलेने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यानंतर मंगळवारी घडलेला हा प्रकार उघडकीस आला आहे. ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विनयभंगाच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे.

दादर ते मुलुंड स्थानकांदरम्यान घडला धक्कादायक प्रकार

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मंगळवारी दादर स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात बसली होती. प्रवासादरम्यान ती मोबाईल पाहत असताना, महिला डब्याच्या शेजारी असलेल्या डब्यात उभा असलेला एक वृद्ध व्यक्ती तिच्याकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचे तिच्या लक्षात आले.

मुलुंड स्थानकात आरोपी फरार, शोध सुरू

लोकल मुलुंड स्थानकात पोहोचताच महिला खाली उतरली आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी शेजारच्या डब्याकडे गेली. मात्र, गर्दीचा फायदा घेत संबंधित व्यक्तीने तिथून पळ काढला. रेल्वे पोलिसांनी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपीदेखील मुलुंड स्थानकात उतरल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटवून त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपासासाठी हे प्रकरण आता कुर्ला रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in