

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल. तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी २.१७ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील व आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी २.५८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, मुलंड स्थानकावर या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील, अशे स्पष्ट केले.