Mumbai : लोकलमधील जागेवरील वादातून प्रवाशाची गाडीवर दगडफेक; एकाच्या डोळ्याला इजा; तरुणाला अटक

मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगडफेक केल्याच्या आरोपाखाली २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने केलेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला आहे.
Mumbai : लोकलमधील जागेवरील वादातून प्रवाशाची गाडीवर दगडफेक; एकाच्या डोळ्याला इजा; तरुणाला अटक
Mumbai : लोकलमधील जागेवरील वादातून प्रवाशाची गाडीवर दगडफेक; एकाच्या डोळ्याला इजा; तरुणाला अटक
Published on

मुंबई : मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगडफेक केल्याच्या आरोपाखाली २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने केलेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना मंगळवारी (दि. ३) घडली. दादर पश्चिम येथील रहिवासी असलेला प्रवासी निशांत खत्री रात्री १०.४० वाजता अंधेरीहून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले होते.

प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्ये जागेवरून वाद झाला. त्यापैकी एकाने वांद्रे येथे रुळांवर उतरल्यानंतर एक दगड उचलून ट्रेनवर फेकला. त्याचा उद्देश ज्या प्रवाशाशी वाद झाला होता त्याला मारण्याचा होता, परंतु तो दगड खत्रीच्या डाव्या डोळ्याखाली लागला, असे त्यांनी सांगितले. खत्री वांद्रे स्टेशनवर उतरला आणि तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, ज्यांनी त्याला जवळच्या भाभा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारांसाठी माहीम येथील हिंदूजा रुग्णालयात नेले.

सीसीटीव्ही तपासून घेतले ताब्यात

पोलिसांच्या पथकांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर त्याची माहिती खबऱ्यांना देण्यात आली. आरोपी हा वसईतील रहिवासी असून त्याचे नाव योगेंद्र असे आहे. तो किरकोळ कामे करतो. त्याला गुरुवारी दुपारी दादर स्थानकावरून अटक करण्यात आली. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in