

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेने कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमी प्रवासी वाहतूक करूनही अधिक महसूल मिळवला आहे. हे मुंबईकरांच्या बदलत्या प्रवास पद्धतीचे आणि महसूल स्त्रोतांचे निदर्शक असल्याचे दिसून येत आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, दोन्ही मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या अजूनही कोरोनापूर्व स्तरापेक्षा कमी आहे, मात्र तिकीट महसुलात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवर, २०१८-१९ मध्ये सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या ४३.२२ लाख होती, जी २०२५-२६ मध्ये ३८.७० लाखांवर आली. म्हणजेच दररोज सुमारे ४.५ लाख प्रवाशांची घट झाली आहे. ही घट होऊनही, दैनंदिन महसूल २.४७कोटी रुपयांवरून २.७४ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
पश्चिम रेल्वेवर कोरोनापूर्वीची दैनंदिन प्रवासी संख्या ३४.८७लाखांवरून २०२५-२६ मध्ये २९.५२ लाखांवर आली, तर महसूल २.१२ कोटी रुपयांवरून २.३९ कोटी रुपयांपर्यंत वाढला.
महसूलवाढीची मुख्य कारणे
एसी लोकलचा विस्तार : एसीच्या वाढीव तिकीट दरामुळे महसूल वाढला
विनातिकीट प्रवाशांवर कडक कारवाई: तिकीट तपासणी मोहिमांमुळे दंड आणि तिकीट विक्रीत सुधारणा
लांब पल्ल्याचा प्रवास : लांबच्या उपनगरांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.
'वर्क फ्रॉम होम' संस्कृती आणि मेट्रो रेल्वे सेवेच्या विस्तारामुळे प्रवासी संख्या अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत प्रवासी संख्या कमी झाली असली तरी महसूल वाढल्याचे स्पष्ट दिसते.
मध्य रेल्वेवर २०१८-१९ मध्ये दैनंदिन सरासरी ४३.२२ लाख प्रवासी प्रवास करत होते, मात्र २०२५-२६ मध्ये ही संख्या घटून ३८.७० लाखांवर आली आहे. म्हणजेच दररोज सुमारे ४.५ लाख प्रवाशांची घट झाली. तरीदेखील महसूल २.४७ कोटी रुपयांवरून वाढून २.७४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वेवर २०१८-१९ मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या ३४.८७ लाख होती, जी २०२५-२६ मध्ये कमी होऊन २९.५२ लाखांवर आली. मात्र महसूल २.१२ कोटी रुपयांवरून वाढून २.३९ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
यावरून स्पष्ट होते की, प्रवासी संख्या घटली असली तरी वाढलेल्या भाडे दरांमुळे आणि इतर घटकांमुळे रेल्वेचा महसूल मात्र वाढत आहे.