Mumbai : आज रात्री लोकल साडेसात तास बंद

मध्य रेल्वेवर ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाट विस्ताराच्या कामासाठी आणि परळ व करी रोड स्थानकांदरम्यानचा प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे.
Mumbai : आज रात्री लोकल साडेसात तास बंद
Mumbai : आज रात्री लोकल साडेसात तास बंद
Published on

मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाट विस्ताराच्या कामासाठी आणि परळ व करी रोड स्थानकांदरम्यानचा प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. यामुळे सीएसएमटी ते दादर दरम्यानची उपनगरीय सेवा शनिवारी (४ एप्रिल) रात्री १०:३० ते ५ एप्रिलच्या सकाळी ६:०० वाजेपर्यंत बंद राहील.

ठाणे आणि डोंबिवली प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ब्लॉक

ब्लॉकची तारीख : शनिवारी व रविवारी रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल. प्रभादेवी ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी ब्लॉक शनिवारी व रविवारी रात्री २३:१५ ते ५ एप्रिल रोजी पहाटे ५:४५ वाजेपर्यंत काम चालेल. प. रेल्वेवर मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान जलद मार्गावर रात्री १२:१५ ते पहाटे ४:१५ या वेळेत पश्चिम रेल्वेकडून 'जंबो मेंटेनन्स ब्लॉक' घेण्यात येईल. यावेळी जलद गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट दरम्यान जलद मार्गाऐवजी धीम्या गती मार्गावरून चालवल्या जाणार आहेत, असे रेल्वेने कळवले.

उपनगरीय (लोकल) सेवांवरील परिणाम:

  • या ब्लॉक कालावधीत ठाणे आणि डोंबिवली दरम्यानच्या उपनगरीय फेऱ्या अधूनमधून रद्द राहतील. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांसाठी सेवा उपलब्ध नसेल.

  • डाऊन धीम्या सेवा: परळ येथून ४ एप्रिल रोजी २२:४९ ते दादर येथून ५ एप्रिल रोजी रात्री ००:३३ पर्यंत सुटणाऱ्या आणि विद्याविहार येथून पहाटे ४:४५ ते सीएसएमटी येथून सकाळी ९:०५ पर्यंत सुटणाऱ्या गाड्या मुलुंड आणि कल्याण दरम्यान ‘जलद मार्गावर’ वळवण्यात येतील आणि त्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

  • अप धीम्या सेवा: कल्याण येथून ४ एप्रिल रोजी रात्री २३:२६ ते २३:५२ पर्यंत आणि ५ एप्रिल रोजी पहाटे ३:२३ ते सकाळी ९:५५ पर्यंत सुटणाऱ्या गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.

  • ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद गाड्या त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

  • ब्लॉक दरम्यान सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

  • या दरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या :

  • २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस (४ एप्रिल)

  • १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (५ एप्रिल)

  • २२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस (५ एप्रिल)

ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • प्रवास सुरू होण्याची तारीख - ५ एप्रिल

  • १२१३४ मंगळुरू जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस

  • १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस

  • १११४० होस्पेट-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

logo
marathi.freepressjournal.in