Mumbai Local : मुंबई लोकल पुन्हा एकदा विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा उशिराने

मुंबईची लाईफलाईन (Mumbai Local) पुन्हा एकदा विस्कळीत झाल्यानंतर प्रवाश्यांना त्याचा त्रास भोगावा लागला
Mumbai Local : मुंबई लोकल पुन्हा एकदा विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा उशिराने
Published on

ऐन गर्दीच्या वेळेस जुईनगर स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत तंत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी ६च्या सुमारास हार्बर, ट्रान्स हार्बरवर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. यानंतर सीएसएमटी-पनवेल हार्बर आणि ठाणे-वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर लोकल सेवा उशिराने धावत होती. यामुळे कार्यालयासाठी निघालेल्या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसला.

सिग्नलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागला. त्यानंतर दोन्ही मागावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तरीही यानंतर दोन्ही मार्गावरील गाड्या या १०-१५ मिनिटे उशिराने चालत होत्या. सततच्या होणाऱ्या या अडचणींमुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे. लोकल उशिरा आल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. यामुळे आता नागरिक हैराण झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in