Mumbai Local : पुन्हा एकदा मुंबई लोकलची वाहतूक कोलमडल्याने स्थानकांवर गर्दीच गर्दी!

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची (Mumbai Local) वाहतूक उशिराने धावत होती. तर, दुसरीकडे पश्चिम रेल्वेची वाहतूकदेखील विस्कळित झाली.
Mumbai Local : पुन्हा एकदा मुंबई लोकलची वाहतूक कोलमडल्याने स्थानकांवर गर्दीच गर्दी!

बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबई लोकलची (Mumbai Local) वाहतूक कोलमडली. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत होती. तर अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. तर दोन्ही रेल्वे मार्गांच्या स्थानकांवर प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान अप आणि डाऊन जलदगती मार्गावर पॉइंट फेल झाल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील दोन्ही मार्गावरील फास्ट लोकल रखडल्या. तर दुसरीकडे, मध्य रेल्वे मार्गावर लोकल तब्बल २० ते ३० मिनिटे उशिरा धावत होत्या. कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या मुंबई लोकलची वाहतूक उशिराने धावत होत्या. अप मार्गावरील अनेक लोकल ट्रेन्स रद्द झाल्या. कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीरा धावल्याने हा सगळा घोळ निर्माण झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in