

मुंबई : सीईटी परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफीत समोर आली आहे. याप्रकरणी सीईटी कक्षाने मुंबई येथील आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.
सीईटी कक्षाकडे सीईटीच्या परीक्षेबाबत एका कथित ध्वनिफीतची ध्वनिचित्रफितीची तक्रार प्राप्त झाली होती. या व्हिडिओमधील संभाषणामध्ये एका महिलेने दूरध्वनीद्वारे एका पुरुषाशी संभाषण करताना आर्थिक मोबदला स्वीकारून एमएचटी सीईटी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, उमेदवाराची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे तसेच संबंधित उमेदवाराचे गुण वाढवून देण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे निदर्शनाला येते. या कथित संभाषणामध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करण्यात आलेला आहे.