Mumbai : ढोकळा आवडता, कांदेपोहे नावडते; मंत्रालयात उपाहारगृहात गुजराती खाद्यपदार्थांना स्थान

राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे केंद्र असलेल्या मंत्रालय उपाहारगृहाच्या मेन्यूत आता गुजराती खाद्यपदार्थांना विशेष स्थान देण्यात आले आहे.
Mumbai : ढोकळा आवडता, कांदेपोहे नावडते; मंत्रालयात उपाहारगृहात गुजराती खाद्यपदार्थांना स्थान
Mumbai : ढोकळा आवडता, कांदेपोहे नावडते; मंत्रालयात उपाहारगृहात गुजराती खाद्यपदार्थांना स्थान
Published on: 

मुंबई : राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे केंद्र असलेल्या मंत्रालय उपाहारगृहाच्या मेन्यूत आता गुजराती खाद्यपदार्थांना विशेष स्थान देण्यात आले आहे. ५४ प्रकारच्या पदार्थांच्या यादीत मूग ढोकळा, पांढरा ढोकळा, कच्छी दाबेलीचा समावेश केला आहे. मात्र, महाराष्ट्राचा पारंपरिक खाद्यपदार्थ मानल्या जाणाऱ्या कांदापोह्यांना मेन्यूतून वगळण्यात आले आहे. उपहारगृहात येणाऱ्यांच्या ताटात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थही पडणार आहेत.

सध्याची बदलती जीवनशैली आणि संतुलित पोषण आहाराचा अभावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने मंत्रालय तसेच विधानभवनाच्या उपाहारगृहात पौष्टिक खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रकृतीला हानिकारक ठरणारे चटकदार खाद्यपदार्थ मेन्यूतून बाद करण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठक अथवा शासकीय बैठकांच्यावेळी बटाटावडे, भजी, समोसे असे तळलेले खाद्यपदार्थ देऊ नयेत. नेहमीच्या चहा, कॉफीऐवजी लेमन टी, ग्रीन टी द्यावा, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालय, विधानभवन आणि कोकणभवन येथील उपाहारगृहांसाठी नव्या खाद्यपदार्थाची यादी आणि त्यांचे दर निश्चित केले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)