Mumbai : सिमेंट ब्लॉक अंगावर पडून सुपरवायझरचा मृत्यू

माहीम पश्चिम येथील एका बांधकाम प्रकल्पात खराब झालेल्या सुरक्षा जाळीतून सुमारे ७० ते ८० किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडून २६ वर्षीय साइट सुपरवायझरचा मृत्यू झाला. या धक्कादायक दुर्घटनेप्रकरणी माहीम पोलिसांनी साईट इंजिनिअर आणि बांधकाम प्रकल्पाशी संबंधित इतर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai : सिमेंट ब्लॉक अंगावर पडून सुपरवायझरचा मृत्यू
Mumbai : सिमेंट ब्लॉक अंगावर पडून सुपरवायझरचा मृत्यूप्रातिनिधिक फोटो
Published on

अवधूत खराडे/मुंबई

माहीम पश्चिम येथील एका बांधकाम प्रकल्पात खराब झालेल्या सुरक्षा जाळीतून सुमारे ७० ते ८० किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडून २६ वर्षीय साइट सुपरवायझरचा मृत्यू झाला. या धक्कादायक दुर्घटनेप्रकरणी माहीम पोलिसांनी साईट इंजिनिअर आणि बांधकाम प्रकल्पाशी संबंधित इतर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

झाहिद अहमद असे मृत तरुणाचे नाव असून तो जम्मू-काश्मीरचा रहिवासी होता. माहीम पश्चिम येथील मोरी रोडवर असलेल्या 'श्रीनिधी लिड इन्फ्रा'च्या बांधकाम साइटवर तो सुपरवायझर म्हणून काम करत होता. लेबर कॅम्पमध्ये २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अहमद झोपला असताना ही जीवघेणी दुर्घटना घडली.

निष्काळजीपणाचा बळी

सुरक्षा जाळीमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सिमेंटचा ब्लॉक लटकत राहूनही तो हटवण्यासाठी किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अनिवार्य सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात दाखवलेल्या या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच इंजिनिअर दीपक केळुसकर आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in