

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी ते बोरिवली लोकलमध्ये एका तरुणाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील माहीम रेल्वे स्टेशनवर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माहीम स्टेशनबाहेर किरकोळ धक्काबुक्कीतून हा वाद निर्माण झाला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने चाकू काढून तरुणावर हल्ला केला. या तरुणाचे नवीन प्रसन्ना असून तो ३५ वर्षांचा आहे. नवीन हा माहिम पश्चिम परिसरातील पितांबर लेनमधील रहिवाशी आहे.
अज्ञात हल्लेखोराला नवीनचा धक्का लागला व त्याचा मोबाईल फोन पडला. यानंतर नवीनने सॉरी म्हटलं तरीही त्याला राग अनावर झाला. त्याने शिवीगाळ करत तरुणाचा स्टेशनबाहेरपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर चाकू काढून त्याने नवीनवर हल्ला केला. या हल्ल्यात नवीन जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मारेकरी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.