Mumbai : मानखुर्दमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार, १९ वर्षांच्या तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा

मानखुर्द पोलिसांनी एका १९ वर्षीय मुलीविरुद्ध 'एकतर्फी प्रेमा'तून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणीने अल्पवयीन मुलावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि नंतर लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्याचे अपहरण केले
Mumbai : मानखुर्दमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार, १९ वर्षांच्या तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा
Mumbai : मानखुर्दमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार, १९ वर्षांच्या तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा
Published on

मुंबईच्या मानखुर्द परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्द पोलिसांनी एका १९ वर्षीय मुलीविरुद्ध 'एकतर्फी प्रेमा'तून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणीने अल्पवयीन मुलावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि नंतर लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्याचे अपहरण केले, असा आरोप आहे. 'लोकमत टाइम्स'ने हे वृत्त दिलं आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा मानखुर्द परिसरात राहतो आणि आरोपी सानिया (१९) देखील त्याच परिसरातील रहिवासी आहे. सानिया पीडित मुलाला ओळखत होती आणि तिचे त्याच्यावर एकतर्फी प्रेम होते.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अत्याचार

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून पीडित मुलावर अत्याचार सुरू झाले. पहिले आरोपी तरुणीने मुलाला फुस लावून तिच्या घरी नेले आणि त्याच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव आणला. जर याबाबत कोणाला काही सांगितले तर त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकीही तिने दिली होती, असे पीडित मुलाने पोलिसांना सांगितले.

लग्नास नकार दिल्यामुळे अपहरण

आरोपी तरुणीने ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वारंवार मुलाचा छळ केला. लग्न करण्यासाठी सतत मुलावर दबाव आणत होती. मुलाने लग्नास नकार दिल्यावर तिने स्वतःचं बरं-वाईट करण्याची धमकी दिली आणि अखेर त्याचे अपहरण केले. मुलाने तिच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर आणि संपूर्ण घटना त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. कुटुंबाने तात्काळ मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आरोपी फरार, शोधमोहिम सुरू

"पीडित मुलाच्या जबाबाच्या आधारे, आम्ही १९ वर्षीय मुलीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरणाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गुन्हा दाखल झाला असला तरी, पोलिसांनी अद्याप आरोपी तरुणीला अटक केलेली नाही. आरोपी सध्या फरार आहे आणि तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in