Mumbai : जेम पोर्टलवर उत्पादक गायब; मिडलमॅनच्या माध्यमातून शालेय वस्तूंचा पुरवठा, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांचा आरोप

थेट उत्पादकांकडून मुंबई महापालिकेच्या विविध विभागांसाठी वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी ‘जेम’ पोर्टल मुंबई महापालिकेने अंमलात आणले आहे.
Mumbai : जेम पोर्टलवर उत्पादक गायब; मिडलमॅनच्या माध्यमातून शालेय वस्तूंचा पुरवठा, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांचा आरोप
Mumbai : जेम पोर्टलवर उत्पादक गायब; मिडलमॅनच्या माध्यमातून शालेय वस्तूंचा पुरवठा, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांचा आरोप
Published on

मुंबई : थेट उत्पादकांकडून मुंबई महापालिकेच्या विविध विभागांसाठी वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी ‘जेम’ पोर्टल मुंबई महापालिकेने अंमलात आणले आहे. मात्र जेम पोर्टलवरून उत्पादकच गायब असून मिडलमॅनच्या माध्यमातून शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना छत्री देण्यात येणार आहे. यासाठी जेम पोर्टलवर निविदा मागविण्यात आल्या आहेत. जेम पोर्टलवर छत्री उत्पादकांची यादी मिळेल. छत्रीचा पुरवठा करण्यासाठी तीन पुरवठादार समोर आले. मात्र एकच निविदाकार पात्र ठरला. त्यामुळे पावसाळ्यात छत्रीचा पुरवठा कसा होणार,” असा सवाल आजमी यांनी उपस्थित केला.

“मुंबई महानगरपालिकेने शालेय वस्तू थेट उत्पादकाकडून खरेदी करता येतील, यासाठी महाटेंडरऐवजी जेम पोर्टलचा वापर सुरू केला आहे. पण महाटेंडर व जेम पोर्टलमधील अटी-शर्ती वेगवेगळ्या असल्यामुळे शालेय वस्तू खरेदीमध्ये स्पर्धा झाली नाही. त्यामुळे जुन्याच कंत्राटदारांना वस्तू पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

शालेय वस्तू खरेदीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या खरेदीवर आक्षेप घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने महाटेंडरद्वारे शालेय वस्तू खरेदीच्या निविदा प्रक्रिया राबवल्या होत्या. मात्र सत्ताधारी भाजपच्या निर्देशानुसार जेम पोर्टलवरून शालेय वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण महाटेंडर व जेम पोर्टलच्या अटी-शर्ती वेगवेगळ्या असल्यामुळे महापालिकेचा उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी केला आहे. जेम पोर्टलमुळे शालेय वस्तू उत्पादकाकडून खरेदी करणे शक्य होणार होते. परंतु उत्पादक अटी-शर्ती पूर्णच करू शकले नाही. त्यामुळे शालेय वस्तू पुरवठादाराकडून घेण्यात येणार आहेत.

Mumbai : जेम पोर्टलवर उत्पादक गायब; मिडलमॅनच्या माध्यमातून शालेय वस्तूंचा पुरवठा, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांचा आरोप
Mumbai : महापालिकेत आता सर्व खरेदी 'जेम' पोर्टलवरूनच; गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी मध्यवर्ती खरेदी विभागाचा निर्णय

फायदा पुरवठादाराचा, नुकसान पालिकेचे

छत्री खरेदीमध्ये कोलकात्याचा पुरवठादार असून छत्री उत्पादन करणारी सन कंपनी मुंबईत आहे. त्यामुळे पुरवठादाराचा फायदा असून महापालिकेचे नुकसानच आहे. शालेय वस्तू खरेदीचे तीन प्रस्ताव मंजूर झाले. त्यात एकच निविदाकार वह्या खरेदीसाठी राबवलेल्या निविदेमध्ये होते. त्यामुळे जेम पोर्टलचा काहीच फायदा झाला नसून जुन्याच कंत्राटदारांकडून पुन्हा वस्तू खरेदी करण्यात येणार आहेत. जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट मिळावे, यासाठी मागच्या दाराने अधिकाऱ्यांनीही मदत केली असून या खरेदीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आजमी यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in