मुंबई महापालिका मुख्यालयावर १८ डिसेंबरला मोर्चा; मराठी शाळा बंद पाडल्या जात असल्यावरून मराठी अभ्यास केंद्र आक्रमक

मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ आंदोलन करून उपयोग नाही, तर ठोस कृतिशील कार्यक्रमाची गरज आहे. मराठी भाषेबाबत सकारात्मक विचार करणाऱ्या मंडळींनी सर्वप्रथम आपली मुले मराठी शाळांमध्ये घालावीत. मुंबई मराठी शाळा या ठरवून बंद केल्या जात असल्याचा आरोप करत पालिकेला याबाबत जाब विचारण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयावर गुरुवार १८ डिसेंबरला सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे...
मराठी शाळा बंद पाडल्या जात असल्यावरून मराठी अभ्यास केंद्र आक्रमक
मराठी शाळा बंद पाडल्या जात असल्यावरून मराठी अभ्यास केंद्र आक्रमक
Published on

मुंबई : मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ आंदोलन करून उपयोग नाही, तर ठोस कृतिशील कार्यक्रमाची गरज आहे. मराठी भाषेबाबत सकारात्मक विचार करणाऱ्या मंडळींनी सर्वप्रथम आपली मुले मराठी शाळांमध्ये घालावीत. मुंबई मराठी शाळा या ठरवून बंद केल्या जात असल्याचा आरोप करत पालिकेला याबाबत जाब विचारण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयावर गुरुवार १८ डिसेंबरला सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले.

मराठी शाळा बंद पाडल्या जात असल्यावरून मराठी अभ्यास केंद्र आक्रमक
मराठी शाळा बंद पाडल्या जात असल्यावरून मराठी अभ्यास केंद्र आक्रमक

मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना शोधण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेली ‘ठरवून बंद पाडलेल्या/पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ रविवारी दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांच्या उपस्थितीत मराठी शाळांच्या सद्यस्थितीवर विचारमंथन झाले आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. यावेळी मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमीत, फोरम फॉर जस्टीसचे सुधीर हेगिष्टे, शाळा वाचवा समितीचे दीपक डोके, उत्पल व. बा., महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे सचिव शिवराम दराडे, शिक्षक सेनेचे जालिंदर सरोदे, आपच्या प्रणाली राऊत, जनजागृती विद्यार्थी सेनेचे संतोष सुर्वे, सामाजित कार्यकर्ते डॉ. योगेश भालेराव, श्री साई सिद्धी सेवा संस्थेचे विजय मोरे, एफ. एम. इलियास, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या संगीता कांबळे आदी उपस्थित होते.

शाळांच्या जागांवर मॉल, टॉवर्स

मराठी शाळांचे भूखंड स्वस्त दरात घेऊन बिल्डरांना देऊन त्या जागांवर मॉल-टॉवर उभारण्याचा धंदा महाराष्ट्रात सुरू आहे. त्यातच इंग्रजी आणि मराठी भाषेतील तुलना करून मराठीला दुय्यम ठरवले जाते. इंग्रजी न येणाऱ्यांनाच मराठीची आवड असते, हा विचार नववसाहतवादी आहे. त्यासाठी प्रशासनातील मुजोर अधिकारी आणि राजकारणी जबाबदार आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in