मातेश्वरी कंपनीच्या कामगारांचे कामगार दिनी आंदोलन

चार बस आगारात, काम बंदचा इशारा; प्रवाशांचे हाल होणार
मातेश्वरी कंपनीच्या कामगारांचे कामगार दिनी आंदोलन
Published on

पगार वाढ, ज्वाईनिंग लेटर, वार्षिक सुट्ट्या, रेस्ट रुम, बाथरुमची सुविधा अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मातेश्वरी कंपनीच्या कामगारांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आज, १ मे कामगार दिनी सांताक्रुझ, धारावी, मजास व प्रतीक्षा नगर या चार बस आगारातील मातेश्वरी कंपनीचे चालकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे चार मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सांताक्रुझ, धारावी मजास व प्रतीक्षा नगर बस आगारातून मातेश्वरी कंपनीच्या बसेस प्रवासी सेवेत रस्त्यावर धावतात; मात्र कंपनीकडून वेळेवर वेतन मिळत नाही, सुट्ट्या मिळत नाही, पगार वाढ नाही, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले. मात्र पदरी निराशाच पडली असे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज,१ मे कामगार दिन असून, या दिवशी तरी कंपनीला कामगारांचे प्रश्न पुन्हा एकदा समोर यावे यासाठी चार बस आगारात काम बंद आंदोलन करणार असल्याचे समजते.

'या' आहेत मागण्या

-सेवेत रुजू झाल्याचे लेटर

-वार्षिक सुटट्या देण्यात याव्या.

-वार्षिक पगार वाढ

-कॅटींग सुविधा, रेस्ट रूम, बाथरूमची व्यवस्था

कायदेशीर कारवाईचा इशारा

बेकायदेशीररित्या अकारण कुणी संप करून कंपनीचे नुकसान करू पाहत असेल, तर त्या कामगारांवर कायदेशीररित्या कडक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी, असे पत्रक सांताक्रुझ, धारावी मजास व प्रतीक्षा नगर बस आगारात लावण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in