Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

खटल्याच्या सुनावणीला सातत्याने गैरहजर राहल्याने हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावताना पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास बेल बाँड रद्द करून वॉरंट काढण्याची तंबी दिल्याने कायदेशीर पेच टाळण्यासाठी महापौरांनी हजेरी लावली.
Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर
Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजरसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : दहा वर्षांपूर्वी दोघा शिक्षकांना केलेल्या कथित मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणी महापौर रितू तावडे यांनी अखेर सत्र न्यायालयात हजेरी लावली. खटल्याच्या सुनावणीला सातत्याने गैरहजर राहल्याने हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावताना पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास बेल बाँड रद्द करून वॉरंट काढण्याची तंबी दिल्याने कायदेशीर पेच टाळण्यासाठी महापौरांनी हजेरी लावली.

२९ जुलै २०१६ रोजी वाकोला परिसरातील महापालिकेच्या एका उर्दू माध्यम शाळेत ही घटना घडली होती. शाळेतील एका महिला शिक्षिकेची बदली वांद्रे-कुर्ला संकुल येथील दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. संबंधित शिक्षिका कर्करोगाने ग्रस्त असल्याने तिच्या बदलीला विरोध करण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते. तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.