

विशेष प्रतिनिधी/मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी फूल सिंह कुमार हा गुन्हा घडला तेव्हा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा (अल्पवयीन) होता का, याची शहानिशा करण्याचे निर्देश विशेष मकोका न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी आरोपीच्या वयाबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी त्याला तत्काळ बालसुधारगृहात हलवण्याची मागणी मात्र फेटाळून लावली आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला या दाव्याची पडताळणी करून पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
फूल सिंह व इतर ११ आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. फूल सिंगसह काही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली, तर उर्वरित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, टायगरवील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.