Mumbai : वैद्यक परिषद निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप?

मुंबईतील एशियाटिक सोसायटी पाठोपाठ आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून एका उमेदवाराने माघार घेतली आहे.
Mumbai : वैद्यक परिषद निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप?
Mumbai : वैद्यक परिषद निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप?
Published on

मुंबई : मुंबईतील एशियाटिक सोसायटी पाठोपाठ आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून एका उमेदवाराने माघार घेतली आहे. उमेदवारांवर माघारीसाठी दबाव टाकण्यात येत असल्यामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय वैद्यक संघटनेतील (आय.एम.ए.) तसेच वैद्यक परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सभासदांनी एकत्र पॅनल तयार केले आहे.

या पॅनेलमधील उमेदवारांवर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप ‘आयएम ए’चे माजी अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनी केला आहे. या दबावामुळे पॅनलमधील एका उमेदवाराने माघार घेतल्याचे डॉ. पिंगळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र वैद्यक परिषद आणि ‘आयएमए’ ही संघटना कोणाच्याही दावणीला बांधली जाणार नाही. आपल्याला आपली वैद्यकीय स्वायत्तता जपायची आहे. त्यामुळे सजग व्हा, एकत्र या आणि दबाव टाकणाऱ्या मतदानातून उत्तर द्या, असे आवाहन डॉ. पिंगळे यांनी मतदारांना केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in