मुंबईमध्ये सुरु असलेल्या मध्य रेल्वेच्या उल्हासनगर स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक शनिवार-रविवारी मध्य रात्री १.२० वाजल्यापासून ते ३.२० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील लोकल सेवेच्या वेळेत काहीसा बदल करण्यात येणार आहे.
सीएसएमटी येथून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द केल्या आहेत. सीएसएमटी येथून मध्य रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला येथे टर्मिनेट करण्यात येईल. सीएसएमटी येथून रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटणार आहे.
ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटणार आहे आणि खोपोली येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल, खोपोली येथून १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरिता पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.४७ वाजता सुटणार आहे. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून पहाटे ०३.४० वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन सेवा रद्द राहणार आहे.