मेट्रो ३ ला अग्निशमन सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा

आरे ते कुलाबा या भुयारी मेट्रो मार्ग-३ प्रकल्प पूर्णतेकडे आणखी एक पाऊल पुढे सरकला आहे. वरळी-कफ परेड या अंतिम टप्प्याला आता अग्निसुरक्षा प्रमाणपत्र (फायर एनओसी) मिळणे बाकी आहे.
मेट्रो ३ ला अग्निशमन सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा
Published on

मुंबई : आरे ते कुलाबा या भुयारी मेट्रो मार्ग-३ प्रकल्प पूर्णतेकडे आणखी एक पाऊल पुढे सरकला आहे. वरळी-कफ परेड या अंतिम टप्प्याला आता अग्निसुरक्षा प्रमाणपत्र (फायर एनओसी) मिळणे बाकी आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी होऊन पुढील परवानगी दिली जाईल, अशी माहिती प्रकल्प कार्यान्वित करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.

सीएमआरएसची परवानगी मिळाल्यानंतरच कोणत्याही मेट्रो मार्गाचे व्यावसायिक संचालन सुरू होऊ शकते.

सध्या आरे-जेव्हीएलआर ते वरळी या २२ किमीच्या मार्गावरच सेवा सुरू आहे. या मार्गावरील प्रवासीसंख्या सुरूवातीपासून सातत्याने वाढत आहे. 'मेट्रो-३' ची (ॲक्वा) सुरुवात दोन टप्प्यांत झाली होती. प्रथम आरे ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), त्यानंतर ती वरळीपर्यंत वाढवण्यात आली.

एमएमआरसीएलच्या अंदाजानुसार, या मार्गावरील सुमारे ८५ टक्के प्रवासी रस्ते वाहतूक सोडून मेट्रोकडे वळतील. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर दररोज सुमारे

logo
marathi.freepressjournal.in