

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) विविध मेट्रो रेल्वे संस्थांच्या ऐवजी सर्व मेट्रो संस्थांचे एकत्रीकरण करून एकत्रीकृत मेट्रो रेल संस्था स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकत्रिकृत मेट्रो रेल संस्था स्थापन करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करण्याकरीता समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती लंडन, सिंगापूरमधील संस्थांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. ही समिती ३ महिन्यांत आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.
समितीचे उद्दिष्ट:
- मेट्रो रेल्वे संस्थांचे एकत्रीकरण करून एकत्रीकृत मेट्रो रेल संस्था स्थापन करणे
- लंडन आणि सिंगापूरमधील संस्थांचा अभ्यास करणे
- ३ महिन्यांत अहवाल शासनास सादर करणे
अशी आहे समिती
एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक - २, नगरविकास विभागाचे सह सचिव (नवि-७) यांचा सदस्य, तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (नियोजन) यांचा सदस्य-सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.