Mumbai : मेट्रो लाइन २ बी प्रकल्पाला वेग; हलाव पूल येथे दोन यू-गर्डरची यशस्वी उभारणी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारण्यात येत आलेल्या डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो लाइन २बी च्या कामाला गती आली आहे. कुर्ला येथील हलाव पुलावर शनिवारी पहाटे ४ वाजता दोन यू-गर्डरचे यशस्वीरीत्या लाँचिंग पूर्ण करण्यात आले. यामुळे गेले अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा वेग आला आहे.
Mumbai : मेट्रो लाइन २ बी प्रकल्पाला वेग; हलाव पूल येथे दोन यू-गर्डरची यशस्वी उभारणी
Mumbai : मेट्रो लाइन २ बी प्रकल्पाला वेग; हलाव पूल येथे दोन यू-गर्डरची यशस्वी उभारणी
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारण्यात येत आलेल्या डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो लाइन २बी च्या कामाला गती आली आहे. कुर्ला येथील हलाव पुलावर शनिवारी पहाटे ४ वाजता दोन यू-गर्डरचे यशस्वीरीत्या लाँचिंग पूर्ण करण्यात आले. यामुळे गेले अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा वेग आला आहे.

मेट्रो लाइन २बी हा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम कॉरिडोर असून, डी. एन. नगर, बीकेसी, कुर्ला, चेंबूर व मंडाले या प्रमुख निवासी व व्यापारी केंद्रांना जोडणारा मार्ग आहे. या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पातील हलाव पूल परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने मेट्रो व्हायाडक्ट व विद्यमान पूल यांच्यामधील उभ्या अंतराची मर्यादा केवळ ३.५ मीटर आहे. या तांत्रिक मर्यादांसाठी संबंधित यंत्रणांची आवश्यक मंजुरी प्राप्त केल्यानंतर हे काम सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले.

रस्ता मेट्रो मार्गाखालील वाहतुकीमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे या ठिकाणची कामे रात्रीच्या वेळी पार पाडण्यात आली. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले, सुरक्षितता सुनिश्चित झाली व जड यंत्रसामग्रीचे कार्यक्षम नियोजन शक्य झाले.

दोन्ही बाजूंवरील व्हायाडक्टचे काम पूर्ण

हलाव पुलासमोरील एस. जी. बर्वे मार्ग मेट्रो स्थानक विमान वाहतूक उंची निकषांनुसार एकस्तरीय स्वरूपात नियोजित करण्यात आले आहे. स्थानकाच्या पायाभूत व पिअर कामांसह हलाव पूलाच्या दोन्ही बाजूंवरील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे.

पुढील काम प्रगतिपथावर

प्रत्येकी २० मीटर लांबीचे दोन यू-गर्डर हे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली उभारण्यात आले. या टप्प्यानंतर प्रकल्प ट्रॅक बसविणे, ओव्हरहेड कॅटेनरी प्रणाली, वीजपुरवठा व्यवस्था व दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणी अशा पुढील काम प्रगतिपथावर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in