Mumbai : मेट्रो मार्गिका ९ आणि ७ चे एकत्रीकरण; मेट्रो मार्गिका २ए व ७ या मार्गावर १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तात्पुरते वेळापत्रक

गुंदवली ते ओवरीपाडा मेट्रो मार्गिका ७ आणि दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो ९ मार्गिकेचे प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत दहिसर पूर्व ते डी. एन. नगर मेट्रो मार्गिका २ए व मेट्रो मार्गिका ७ या दोन्ही मार्गांवर तात्पुरते वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा धावणार आहेत.
Mumbai : मेट्रो मार्गिका ९ आणि ७ चे एकत्रीकरण; मेट्रो मार्गिका २ए व ७ या मार्गावर १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तात्पुरते वेळापत्रक
Published on

मुंबई : गुंदवली ते ओवरीपाडा मेट्रो मार्गिका ७ आणि दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो ९ मार्गिकेचे प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत दहिसर पूर्व ते डी. एन. नगर मेट्रो मार्गिका २ए व मेट्रो मार्गिका ७ या दोन्ही मार्गांवर तात्पुरते वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा धावणार आहेत.

सध्या मेट्रो मार्गिका ७ वर १३ स्थानकांदरम्यान सेवा सुरू आहे. तर मार्गिका ७ ची विस्तारित मार्गिका ९ चे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्गिकेचे आरडीएसओ तपासणी २३ सप्टेंबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून सुरक्षा चाचण्या आणि ट्रायल रन सुरू आहेत. गुंदवली ते काशीगाव दरम्यान ट्रायल रन घेण्यात येतील. त्यामुळे सकाळी ५.२५ वाजता सुरू होणाऱ्या मेट्रो सेवेसाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना मुंबई वन अॅप, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व स्थानकावरील माहिती फलक यांवर उपलब्ध अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मेट्रो मार्गिका ७ आणि दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो ९ मार्गिकेचे प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेण्यात आल्याने लवकरच गुंदवली ते मिरा गाव दरम्यान अखंड मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे.

सुधारित मेट्रो सेवा वेळापत्रक

डहाणूकरवाडीहून गुंदवलीकडे पहिली मेट्रो :

सोमवार ते शुक्रवार - सकाळी ७:०१ वाजता

शनिवार - सकाळी ७:०० वाजता

रविवार - सकाळी ७:०४ वाजता

अंधेरी (पश्चिम) कडे पहिली मेट्रो :

सोमवार ते शुक्रवार - सकाळी ०७:०६ वाजता

शनिवार - सकाळी ०६:५८ वाजता

रविवार - सकाळी ०६:५९ वाजता

दहिसर (पूर्व) हून अंधेरी (पश्चिम) कडे पहिली मेट्रो :

सोमवार ते शुक्रवार - सकाळी ६:५८ वाजता

शनिवार - सकाळी ७:०२ वाजता

रविवार - सकाळी ७:०२ वाजता

गुंदवलीकडे पहिली मेट्रो :

सोमवार ते शुक्रवार - सकाळी ६:५८ वाजता

शनिवार - सकाळी ७:०६ वाजता

रविवार - सकाळी ७:०१ वाजता

अंधेरी (पश्चिम) हून - गुंदवलीकडे पहिली मेट्रो :

सोमवार ते शुक्रवार - सकाळी ७:०१ वाजता

शनिवार - सकाळी ७:०२ वाजता

रविवार - सकाळी ७:०४ वाजता

गुंदवलीहून पहिली मेट्रो अंधेरी (पश्चिम) कडे पहिली मेट्रो :

सोमवार ते शुक्रवार - सकाळी ७:०६ वाजता

शनिवार - सकाळी ७:०२ वाजता

रविवार - सकाळी ७:०० वाजता

logo
marathi.freepressjournal.in