Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

मुंबई दुग्ध उत्पादक संघाने म्हशीच्या सुट्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत डेअरीवर मिळणाऱ्या सुट्या दुधाचा दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे.
Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार
Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने म्हशीच्या सुट्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत डेअरीवर मिळणाऱ्या सुट्या दुधाचा दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे.

हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. त्यानंतर पुन्हा एकदा याचा आढावा घेण्यात येणार आहे. हे घाऊक दर असल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना स्थानिक विक्रेते आणि वाहतूक खर्चानुसार दुधासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दिलेल्या माहितीनुसार दुधाच्या दरातील बदल पुढीलप्रमाणे असतील. म्हशीच्या सुट्या दुधाचा सध्याचा घाऊक दर ९३ रुपये प्रतिलिटर असून यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये हा दर ९१ रुपयांवरून ९३ रुपये झाला होता. आता १ सप्टेंबर २०२६ पासून नवीन घाऊक दर हा ९ रुपयांची थेट वाढीसह १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी या दरवाढीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘भेसळ रोखल्याने निर्माण झालेल्या तुटवड्याचा गैरफायदा घेत खाजगी डेअरींची मनमानी सुरू झाली आहे. आरे किंवा महानंदासारख्या सरकारी डेअरी पूर्ण क्षमतेने सुरू असत्या तर ही मनमानी झाली नसती’.

पशुखाद्यांच्या महागाईचा फटका

पॅकेटबंद दुधाच्या दरांवर या वाढीचा थेट परिणाम होणार नाही. अमूल किंवा मदर डेअरी यांसारख्या कंपन्या आपापल्या उत्पादन खर्चानुसार किरकोळ दर ठरवतील. उत्पादकांनी आणि संघाने दरवाढीमागे काही महत्त्वाची कारणे स्पष्ट केली आहेत. त्यानुसार पशुखाद्याच्या दरात २५ टक्के झालेली वाढ तसेच दाणा, तूरचुणी, चणाचुणी, चारा आणि पेंड यांच्या किमतीतही सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in