Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रात्री गरबा खेळत असताना काही अज्ञात व्यक्तींकडून अंडी व टोमॅटो फेकल्याचा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Published on

भाईंंदर : मीरारोड हटकेश भागातील जे.पी. नॉर्थ गृहसंकुलमध्ये मंगळवारी रात्री गरबा खेळत असताना काही अज्ञात व्यक्तींकडून अंडी व टोमॅटो फेकल्याचा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जे.पी. नॉर्थ इमारतीत गरबा आयोजित करण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे मोहसीन खान या रहिवाशाने ११२ वर तक्रार केली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, १०:५० वाजताच्या सुमारास गरबा खेळण्याच्या जागी अंडी व टोमॅटो फेकल्याचा प्रकार घडला. स्थानीय नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एस्टेला बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरून मोहसीन खान सारख्या व्यक्तीने काहीतरी खाली फेकले. थोड्याच वेळात दोन फुटलेली अंडी पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ आढळली. यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली.

धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलीस घटनास्थळी धाव घेतली. अनेक राजकीय नेते आणि हिंदूवादी संघटनांनी संकुलात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. काहींनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर काहींनी शांततेचे आवाहन केले. रहिवाशांनी मोहसीन खानवर संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख महेश शिंदे यांनी अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार सहन केले जाणार नाही असा इशारा दिला. त्यांनी म्हटले की, लोकांच्या मागणी नुसार मोहसीन खानवर गुन्हा दाखल न होईपर्यंत आपण येथे हटणार नाही.

मोहसीन खान यांनी सांगितले की, घटनास्थळी असताना ते सोसायटीच्या प्रांगणात उभे होते आणि त्यांच्या तिन्ही खिडक्यांवर जाळी असल्यामुळे काहीही फेकले जाऊ शकत नाही. त्यांनी आरोप केला की, येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in