Mumbai : इंस्टाग्रामवरील 'मैत्री' ४० लाखांना पडली; मिरा रोडमधील महिलेची आर्थिक फसवणूक

सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून मिरा रोड येथील एका ३२ वर्षीय महिलेला डिजिटल मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका भामट्याने मौल्यवान दागिने आणि परदेशी चलनाच्या नावाखाली या महिलेला तब्बल ४० लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
Mumbai : इंस्टाग्रामवरील 'मैत्री' ४० लाखांना पडली; मिरा रोडमधील महिलेची आर्थिक फसवणूक
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भाईंदर : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून मिरा रोड येथील एका ३२ वर्षीय महिलेला डिजिटल मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका भामट्याने मौल्यवान दागिने आणि परदेशी चलनाच्या नावाखाली या महिलेला तब्बल ४० लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

मिरा रोड पूर्वेच्या रामदेव पार्क येथे राहणाऱ्या प्रियांका अगरवाल (३२) यांची ॲलेक्स नावाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलशी ऑगस्ट २०२५ मध्ये ओळख झाली होती. या भामट्याने बनावट आयडी वापरून फिर्यादीशी मैत्री वाढवली आणि त्यांचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी मी तुमच्यासाठी एक मौल्यवान पार्सल पाठवले असून त्यात दागिने आणि ३० हजार पौंड आहेत, असे ॲलेक्स याने त्या महिलेला सांगितले.

कस्टमने पार्सल पकडल्याचा केला बनाव

हे पार्सल मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने पकडले असून ते सोडवण्यासाठी पैशांची गरज आहे, असे सांगितले. या भामट्याने केवळ पार्सलच नव्हे, तर मी स्वतः भारतात आलो आहे, पण माझ्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने मला अटक करण्यात आली आहे, असे खोटे सांगून फिर्यादीची सहानुभूती मिळवली. या जाळ्यात अडकलेल्या महिलेने ऑगस्ट २०२५ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर एकूण ४० लाख ६ हजार १ रुपये पाठवले.

logo
marathi.freepressjournal.in