रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाला गती; ‘एमएमआरडीए’ला १५०० कोटींचा कर्जपुरवठा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर पुनर्विकासासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून १ हजार ५०० कोटींचा कर्जपुरवठा मिळवला आहे.
रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाला गती; ‘एमएमआरडीए’ला १५०० कोटींचा कर्जपुरवठा
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर पुनर्विकासासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून १ हजार ५०० कोटींचा कर्जपुरवठा मिळवला आहे. या कर्जाच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला गती मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी ‘एमएमआरडीए’ने विविध स्त्रोतांद्वारे निधी उभारणीची रणनीती आखली आहे. ८ हजार ४९८ कोटींच्या प्रकल्पापैकी ३ हजार ९१६ कोटी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. यातील १ हजार ५०० कोटींचा पहिला हप्ता बँक ऑफ महाराष्ट्रकडून मंजूर झाला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री व ‘एमएमआरडीए’चे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले की, १५०० कोटींच्या कर्जमंजुरीमुळे राज्य सरकार आणि ‘एमएमआरडीए’वर लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे. हा प्रकल्प रमाबाई नगरमधील हजारो कुटुंबांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल.

logo
marathi.freepressjournal.in