Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे मोनोरेलची सेवा २० सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. मोनोची प्रणाली बळकट झाल्यानंतर या मार्गावरील सेवा सुरू करण्यात येणार आहे.
Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे मोनोरेलची सेवा २० सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. मोनोची प्रणाली बळकट झाल्यानंतर या मार्गावरील सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मोनोरेल चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकदरम्यान चालविण्यात येत आहे. मोनोमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे प्रवासी ट्रेनमध्ये अडकून राहण्याचे प्रकार अलीकडे वारंवार घडले आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने एमएमआरडीएने मोनोची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही बाजूंकडील मोनोरेल सेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मोनोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मुंबई मोनोरेलचे आधुनिकीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने २० सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल सेवा तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

मोनोची सेवा बंद केल्यानंतर नवीन रोलिंग स्टॉक, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग अपग्रेड आणि विद्यमान फ्लीटचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. हैदराबादमध्ये स्वदेशीरित्या विकसित केलेली ‘कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (सीबीटीसी) सिस्टम पहिल्यांदाच मुंबई मोनोरेलमध्ये स्थापित केली जात आहे. तसेच ३२ ठिकाणी ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवले असून याची चाचणी सुरू आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएने ‘एसएमएच रेल’च्या सहकार्याने मेसर्स मेधाकडून १० नवीन मेक-इन-इंडिया रॅक खरेदी केले आहेत. यापैकी कंपनीने ८ रॅक वितरित केले असून ९ वा रेक तपासणीसाठी सादर केला आहे. तर १० वा रेक अंतिम असेंब्लीमध्ये आहे.

यासाठी होणार मोनो बंद

मोनोची सेवा दररोज सकाळी ६:१५ ते रात्री ११:३० पर्यंत सुरू असते. त्यामुळे रात्री फक्त ३.५ तास रेकच्या चाचणीसाठी उरतात. हा वेळ कमी असल्याने मोनो तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in