Mumbai : अचानक बंद पडली मोनोरेल; घटनेची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

प्रवाशांनी खचाखच भरलेली मोनोरेल आज (दि.१९) संध्याकाळी चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अचानक बंद पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला.
Mumbai : अचानक बंद पडली मोनोरेल; घटनेची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस
Published on

प्रवाशांनी खचाखच भरलेली मोनोरेल आज (दि.१९) संध्याकाळी चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अचानक बंद पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. एक तासाहून जास्त वेळ प्रवासी अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच मुंबईअग्निशामक दलाने तीन स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले. आतापर्यंत सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका केल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. दरम्यान, हा प्रकार का घडला याची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया देत सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in