परवानगीच्या कात्रीत अडकले मुलुंडचे पक्षीगृह; केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी नाही

मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. वर्षभरात त्याला वेग देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र...
परवानगीच्या कात्रीत अडकले मुलुंडचे पक्षीगृह; केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी नाही
संग्रहित छायाचित्र
Published on

पूनम पोळ / मुंबई

मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. वर्षभरात त्याला वेग देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र, संग्रहालयाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली नसल्याने पक्षीगृहाचे काम रखडले आहे. त्यामुळे पूर्व उपनगरवासियाना आणखी काही काळ पक्षीगृहासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

नाहूर गाव परिसरात सीटीएस क्रमांक ७०६ हा भूखंड पालिकेने उद्यान व वाहनतळ या उद्देशासाठी आरक्षित आहे. आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येणार असून या ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात येणार आहे. तसेच या उद्यानात पक्षीगृह तयार करण्यात येणार आहे. महापालिकेने या कामासाठी २०२३ मध्ये निविदा मागवल्या होत्या. यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे या

कामासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र केंद्राच्यावतीने अद्याप परवानगी मिळाली नाही. जोपर्यंत केंद्राची परवानगी मिळत नाही. तोपर्यंत पुढील कामाची सुरुवात करता येणार नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानातील पक्षीगृहाच्या धर्तीवर हे पक्षीगृह बनवण्यात येणार आहे. पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि

असे आहे पक्षीगृहाचे नियोजन

मुलुंड येथे प्रस्तावित पक्षी उद्यानात १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी असणार आहेत. मुंबई महापालिकेच्या योजनेनुसार मुलुंड पक्षी उद्यान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे (भायखळा) उपकेंद्र असणार आहे. याचे क्षेत्रफळ १७ हजार ९५८ चौरस मीटर आहे. पक्षीगृहासाठी १० हजार ८५९ चौरस मीटर आणि खेळांसाठी ३ हजार ७२८ चौरस मीटर क्षेत्र या उद्यानात राखीव असणार आहे.

अमेरिका अशी पक्षांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in