Mumbai : मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स उभारणार; प्रकल्प व्यवहार्यतेच्या अभ्यासासाठी BMC ची परवानगी

मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, पालिकेने प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांना या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास करण्यास परवानगी दिली आहे. या संबंधितचे पत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाने बुधवारी पीजीटीई कडे सुपूर्द केले.
मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स उभारणार
मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स उभारणार
Published on

मुंबई : मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, पालिकेने प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांना या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास करण्यास परवानगी दिली आहे. या संबंधितचे पत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाने बुधवारी पीजीटीई कडे सुपूर्द केले.

मुलुंड डम्पिंग ग्राउंडमुळे या भागात अनेक वर्षे राहिवाशांना दुर्गंधी, प्रदूषण आणि पर्यावरणीय त्रासाला सामोरे जावे लागले. या कारणास्तव २०१८ मध्ये कचराभूमी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी डंपिंग ग्राऊंडवरील संपूर्ण कचरा हटविण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर उपलब्ध ६४ एकर मोकळ्या जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याचा प्रस्ताव आमदार मिहिर कोटेचा यांनी पालिकेला दिला.

या प्रकल्पामुळे मुलुंडमधील आर्थिक प्रगती, पायाभूत सुधारणा आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गोल्फ कोर्स हा उपयोगी प्रकल्प ठरू शकतो, असे मत कोटेचा यांनी व्यक्त केले आहे. या प्रस्तावामुळे परिसरातील जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला चालना मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच अशा प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मितीची दारेही उघडू शकतात, असा विश्वास कोटेचा यांनी व्यक्त केला.

मे महिन्यात उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा विषय राज्य सरकारपुढे मांडण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने व्यवहार्यता अभ्यासाला परवानगी देत पुढील टप्पा सुरू केला आहे. मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरून मोठ्या प्रमाणात कचरा हटवल्यानंतर आता या जागेचा पर्यावरणपूरक आणि विकासाभिमुख वापर करण्याची स्थानिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, गोल्फ कोर्स प्रकल्प प्रत्यक्षात राबवला गेल्यास मुलुंडच्या नागरी जीवनमानात सुधारणा, स्वच्छ हवा, प्रदूषणमुक्त वातावरण आणि आर्थिक-सामाजिक विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास कोटेचा यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक प्रकल्प राबवण्याची मागणी

मुलुंड डंपिंग ग्राऊंड गेले काही वर्षांपासून बंद आहे. आता या जागेवर सार्वजनिक वापरासाठी किंवा स्थानिकांसाठी उपयोगी तसेच मुलांसाठीही काही उपक्रम राबवले जावेत. ही जागा मुंबई महापालिकेची असल्यामुळे या ठिकाणी मुंबई महापालिकेने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने

काही उपक्रम राबवावेत, अशी मागणी काही स्वयंसेवी संस्था तसेच रहिवाशांनी, कार्यकर्त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in