Mumbai : महापालिकेकडून दिलेले मलबारो हाऊसचे प्लॅन्स रद्द व अमान्य घोषित

मुंबई महापालिकेने पेडर रोडवरील मलबारो हाऊस इमारतीचे नकाशे आणि कागदपत्रे ‘शून्य व अवैध’ असल्याचे जाहीर केले आहे.
Mumbai : महापालिकेकडून दिलेले मलबारो हाऊसचे प्लॅन्स रद्द व अमान्य घोषित
Mumbai : महापालिकेकडून दिलेले मलबारो हाऊसचे प्लॅन्स रद्द व अमान्य घोषित
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेने पेडर रोडवरील मलबारो हाऊस इमारतीचे नकाशे आणि कागदपत्रे ‘शून्य व अवैध’ असल्याचे जाहीर केले आहे. संबंधित नकाशे महापालिकेच्या अधिकृत अभिलेखांमध्ये उपलब्ध नसल्याने त्यांच्या प्रामाणिकतेची पडताळणी करता येत नसल्याचे पालिकेच्या अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे

महापालिकेच्या डी-वॉर्डच्या सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाना) कार्यालयाने १३ जुलै रोजी काढलेल्या अधिकृत पत्रव्यवहाराद्वारे ही माहिती दिली.

माहिती अधिकार कार्यकर्ते कुशल राजेंद्र अग्रवाल यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये केलेल्या अर्जानंतर मलबारो हाऊसच्या नकाशांच्या प्रती देण्यात आल्या होत्या. मात्र, इमारतीतील रहिवाशांनी हे नकाशे बनावट असून ते पालिकेच्या अधिकृत नोंदीत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर इमारत प्रस्ताव विभागाने चौकशी केली असता, माहिती अधिकाराद्वारे पुरविण्यात आलेले नकाशे अधिकृत अभिलेखात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांची सत्यता पडताळता येत नसल्याने ते ‘शून्य व अवैध’ घोषित करण्यात आले.

महापालिकेच्या पत्रानुसार, उपलब्ध अधिकृत अभिलेखांमध्ये १३ ऑक्टोबर १९६७ रोजी मंजूर करण्यात आलेले नकाशेच अंतिम वैध नोंद म्हणून उपलब्ध आहेत. १९६७, १९७२ आणि १९९५ मधील नकाशांमध्येही काही विसंगती आढळल्याचे नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी संबंधित इमारत प्रस्ताव विभागाकडे अधिक चौकशीसाठी नोंद पाठविण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे माहिती अधिकारांतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, बनावट किंवा अप्रमाणित कागदपत्रे आरटीआयद्वारे कशी देण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

पालिकेच्या रेकॉर्डनुसार, १३ ऑक्टोबर १९६७ मधील (क्र. ईबी/९३८३/डी) प्लॅन्स हेच शेवटचे मंजूर केलेले अंतिम प्लॅन्स आहेत. त्यानुसार, २९ सप्टेंबर २०२५ च्या आरटीआय अर्जाअंतर्गत दिलेले प्लॅन्स आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.

तक्रारीनंतर कारवाई

डी-वॉर्ड कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, ‘मलबारो हाऊस सीएचएस लिमिटेडच्या सदस्यांकडून बीएमसीला एक तक्रार प्राप्त झाली होती. आरटीआयअंतर्गत जारी करण्यात आलेले प्लॅन्स बनावट, खोटे आणि बीएमसीच्या मूळ रेकॉर्डमधील नाहीत, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. सोसायटीच्या सदस्यांनी १९६७, १९७२ आणि १९९५ च्या उपलब्ध प्लॅन्समध्ये अनेक तफावती असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in