मुंबई महापालिकेने राणी बागेतील मत्स्यालयाच्या निविदा केल्या रद्द

वरळी दूध डेअरीतील जागेवर मत्स्यालय होणार असल्याचे कारण पुढे करत राणी बागेतील मत्स्यालयाच्या ४४ कोटींच्या निविदा रद्द
 मुंबई महापालिकेने राणी बागेतील मत्स्यालयाच्या  निविदा केल्या रद्द

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसाठी आकर्षण, भूमिगत बांधण्यात येणारे आंतरराष्ट्रीय मत्स्यालय उभारण्यास मुंबई महापालिकेचे प्रशासकीय आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी खो दिला आहे. वरळी दूध डेअरीतील जागेवर मत्स्यालय होणार असल्याचे कारण पुढे करत राणी बागेतील मत्स्यालयाच्या ४४ कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण होवून त्यात एकापाठोपाठ आकर्षणाची भर पडत आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार या प्राणिसंग्रहालयात वेगवेगळी वैशिष्ट्ये समाविष्ट केली जात आहेत. विशेषतः पेंग्विन प्रदर्शनी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात रोज मोठी झुंबड उडते आहे. सोबतीला नव्याने दाखल झालेले विविध वन्य पशुपक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी येथील रपेट ही नेहमीच पर्वणी ठरत आली आहे. पर्यटक, निसर्गप्रेमी आणि खास करून लहान मुले व विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिकेने या ठिकाणी ४४ कोटी रुपये खर्च करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणीसाठी निविदा प्रक्रिया मागवल्या होत्या. राणीबागेतील पेंग्विन प्रदर्शनी जवळच सुमारे सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार होते. दोन टनेलसह शाॅपिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार होती. मात्र ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती चहल यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in