मुंबई प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेने टाकले एक पाऊल पुढे

मुंबई प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेने टाकले  एक पाऊल पुढे

मुंबई प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. इलेक्िट्रक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी मुंबई महापालिका प्रोत्साहन देत असून भविष्यात इलेक्िट्रक वाहनांच्या चार्जिंगची समस्या दूर करण्यासाठी मुंबईत २८ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी सांगितले. दरम्यान, खासगी इमारतीत इलेक्िट्रक वाहनांच्या पार्किंगसाठी २० टक्के जागा राखीव ठेवणेही बंधनकारक असणार आहे.

गेल्या काही वर्षांत प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असून प्रदूषणमुक्त मुंबईसाठी राज्य सरकारने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी इलेक्िट्रक वाहनांचा वापर काळाची गरज असून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबईतील गाड्यांची संख्या पाहता १५०० चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून इलेक्िट्रक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्िट्रक वाहन धोरण तयार करण्यात आले आहे. पालिकेसोबतच ‘बेस्ट’, महावितरणसह ‘टाटा’, अदानीसारख्या वीज क्षेत्रातील कंपन्यांसोबत या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू आहे.

‘फायर सेफ्टी’साठी स्वतंत्र समिती

इलेक्िट्रक वाहनांमधील दुचाकी आणि चारचाकींमध्ये आग लागून दुर्घटना घडण्याचे प्रकार काही वेळा समोर येतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या ‘फायर सेफ्टी’साठी पालिका, अग्निशमन दल आणि ‘बेस्ट’च्या माध्यमातून निश्चित नियमावली तयार करण्यासाठी उपसमिती तयार करण्यात आली आहे.

असे राबवणार धोरण

मुंबईत यापुढे तयार होणाऱ्या इमारतीत चार्जिंग स्टेशन आणि या वाहनांसाठी २० टक्के पार्किंग उपलब्ध ठेवणे बंधनकारक राहील. बिल्डरला यानुसार इमारतीचे प्लॅनिंग करावे लागेल.

या धोरणाला चालना देण्यासाठी प्रोत्साहनपर योजनाही राबवण्यात येतील. आगामी काळात उभारण्यात येणारी चार्जिंग स्टेशन वॉर्ड ऑफिसजवळ, रुग्णालयांजवळ आणि पालिकेच्या मालमत्तांच्या ठिकाणी उभारण्यात येतील.

नवी चार्जिंग स्टेशन मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात उभारण्यात येतील. पुढील सहा महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण होईल. प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर दोन ते चार वाहनांसाठी चार्जिंग सुविधा असेल.

पालिकेची चार्जिंग स्टेशन

n पालिका मुख्यालय, फोर्ट

n चिंचपोकळी आर्थर रोड गॅरेजजवळ दोन

n इंजिनीअरिंग हब वरळी गॅरेज

n पंतनगर, घाटकोपर

n सांताक्रुझ ट्रान्सपोर्ट गॅरेज

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in