मुंबईकरांच्या शरीरात मिठाचे प्रमाण प्रचंड ; मुंबईकर करतात ८.९ ग्रॅमची मीठाची खादाडी

जागतिक आरोग्य संघटनेचे मीठ खाण्याचे निकष मुंबईकर धाब्यावर बसवत असल्याचे सिद्ध झाले
मुंबईकरांच्या शरीरात मिठाचे प्रमाण प्रचंड ; मुंबईकर करतात ८.९ ग्रॅमची मीठाची खादाडी

मुंबई ही देशाची राजधानी आहे. या शहराला २४ तास सुरू ठेवण्यासाठी मुंबईकरांनाही धावावे लागते. पळापळ करताना मुंबईकरांच्या त्यांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. पौष्टिक अन्न खाण्यापेक्षा मिळेत ते घास पोटात टाकण्याचा मुंबईकरांचा कल असतो. त्यामुळेच की काय मुंबईकरांच्या शरीरात मिठाचे प्रमाण प्रचंड वाढू लागल्याचे मुंबई महापालिकेच्या सर्व्हेक्षणात आढळले आहे. माणसाची दैनंदिन मिठाची गरज ३.९ ग्रॅम असताना मुंबईकर ८.९ ग्रॅमची मीठाची खादाडी करत असल्याचे आढळले. मुंबईकर रोज ५ ग्रॅम मीठ अधिक खाऊन रोगांना निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईकरांच्या आरोग्याकडे मुंबई महापालिकेचे बारीक लक्ष आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मुंबई मनपाकडे शहरवासीयांमध्ये जनजागृती सुरू केली. त्यासाठी मनपाने वैज्ञानिक आधारावर ‘स्टेप्स’ सर्व्हेक्षण केले.

जागतिक आरोग्य संघटनेचे मीठ खाण्याचे निकष मुंबईकर धाब्यावर बसवत असल्याचे सिद्ध झाले. रोज ५ ग्रॅम मीठ अधिक फस्त करत असून त्यांच्यासमोर धोक्याचा कंदील दिसत आहे.या सर्व्हेक्षणात ५१९९ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात २६०१ पुरुष व २५९८ महिला होत्या. ३४ टक्के मुंबईकरांना उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसून आले. तीनपैकी एका मुंबईकराला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तसेच मधूमेह, उच्च कॅलेस्ट्रोरॉल त्याच्या शरीरात ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. शरीरात मीठाचे अतिरिक्त सेवन झाल्यास उच्चरक्तदाबाचा आमंत्रण असते. त्यातून ह्रदयाशी संबंधित आजार होतात. विशेष म्हणजे भारतात मीठाचे सेवन लवकरात लवकर कमी होणे गरजेचे आहे.मुंबई मनपाचे अतिरिक्त आरोग्य आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, अतिरिक्त मीठ खाल्ल्याने ३४ टक्के मुंबईकरांमध्ये उच्च रक्तदाब दिसून आल्याचे आमच्या प्राथमिक सर्वेक्षणात आढळले. उच्च रक्तदाब हा मृत्यूचे मोठे कारण बनला आहे. याचा मुकाबला करण्यासाठी मुंबई मनपातर्फे सर्वंकष सार्वजनिक आरोग्य आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले.१८ ते ६९ वयोगटाला मोठा धोकामुंबईतील १८ ते ६९ वयोगटातील १० पैकी ४ जणांना ह्रदयाशी संबंधित आजारांचा मोठा धोका आहे. तसेच नियमीत ध्रुमपान, भाज्या व फळांचे पुरेशा प्रमाणात सेवन करत नाहीत, अशा ३७ टक्के जणांना ह्रदयविकाराचा धोका आढळला. व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब व ग्लुकोज यामुळे आजारपणा वाढत आहे.मुंबईकरांच्या आरोग्यासाठी जागरूक असलेल्या मुंबई मनपाने तीन स्तरीय आरोग्य पथके तयार केली आहेत. ही पथके झोपडपट्टीत घरोघरी जाऊन उच्च रक्तदाबाची तपासणी करत आहेत. आमच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये असंसर्गजन्य रोगाचा विभाग आहे. तेथे प्रत्येक नोंदणीकृत रुग्णाचा व त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकाचा रक्तदाब तपासला जातो. मुंबई मनपाने सर्वेक्षण केलेल्या २१ टक्के जणांमध्ये कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण १९० एमजी आढळले. जगात असंसर्गजन्य रोग, ह्रदयविकार, कर्करोग, मधूमेह व गंभीर श्वसन रोग आदींमुळे मृत्यू होत आहेत. असंसर्गजन्य आजारांमुळे २०१६ मध्ये जगात ४० दशलक्ष मृत्यू झाले. त्यातील ६१ टक्के मृत्यू हे २०१६ मध्ये भारतात झाले. भारतात ५.८७ दशलक्ष जणांचे मृत्यू झाले.मनपाच्या सर्वेक्षणात ९४ टक्के सहभागी हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या खाद्य पदार्थांच्या निकषात बसत नव्हते. प्रत्येक व्यक्तीने रोज ४०० ग्रॅम भाज्या किंवा फळे खाणे बंधनकारक असल्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. दैनंदिन आहारात भाज्याचे प्रमाण चांगले असल्यास असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होते. मुंबई मनपाच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, मुंबईकरांना असंसर्गजन्य आजाराचा मोठा धोका असल्याचे सर्वेक्षणात आढळले असून त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लोकांनी आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. आम्ही नागरिकांसाठी योगा केंद्रे सुरू केली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मनपाच्या योगा केंद्रात योगा करावा किंवा ४० ते ६० मिनीटे व्यायाम करावा, अशी विनंती आम्ही नागरिकांना करतो. ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी मधूमेह व उच्च रक्तदाब नियमीत तपासून घ्यावा. हे आजार असणाऱ्या रुग्णांना ‘आपला दवाखाना’ येथे डॉक्टरांशी सदैव सल्ला घ्यावा. तसेच नागरिकांनी तंबाखू खाणे बंद करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in