प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये

मुंबईत सुरु असलेली मोठ्या प्रमाणावर बांधकामे तसेच विविध विकास कामे यातून निर्माण होणारी धूळ प्रदूषणाचे मुख्य कारण आहे
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये

मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढले असून, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डातील इमारत विभागातील अधिकाऱ्याने बांधकाम ठिकाणी पहाणी करत नियमांचे उल्लंघन करत मुंबईतील धुळीस कारणीभूत असलेल्या बांधकामांवर कारवाई करा आणि महिनाभरात अहवाल सादर करा, असे आदेश संबंधित वॉर्ड ऑफिसरना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीवकुमार यांनी सांगितले.

मुंबईत सुरू असलेली विकास कामे, बांधकाम कामे यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईतील प्रदूषणास मुख्य कारण धूळ असून, धूळ नियंत्रित करण्यासाठी बांधकाम ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्यास बांधकाम बंद करण्याचा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने याआधी दिला आहे. यासाठी विभाग पातळीवर टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून, टास्क फोर्सच्या माध्यमातून आता विभाग कार्यालय क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणची पहाणी करण्यात येणार आहे. पहाणीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास काम बंद करण्याचे आदेश दिल्याचे संजीवकुमार यांनी सांगितले.

५ हजारांपेक्षा अधिक ठिकाणी कामे सुरू

मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. मुंबईतील हवा यापूर्वी कधीच ऐवढी प्रदूषित नव्हती. त्यामुळे मुंबईत सुरु असलेली मोठ्या प्रमाणावर बांधकामे तसेच विविध विकास कामे यातून निर्माण होणारी धूळ प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी वॉर्ड स्तरावर कार्यवाही करण्यात येईल, असे ही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in