प्रदूषणमुक्तीसाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार; सिनेमागृह, पेट्रोल पंपच्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रदूषणमुक्तीसाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार; सिनेमागृह, पेट्रोल पंपच्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई प्रदूषणमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून, मुंबईत इलेक्टि्रक वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सिनेमागृह, पेट्रोल पंप, पार्किंगच्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल राव यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई ई-व्हेईकल वाहनांची संख्या वाढत असून, एप्रिल २०२२ पर्यंत तब्बल ९ हजार ५९० ई-व्हेईकलची नोंद झाली आहे.मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका, बेस्ट उपक्रमासह राज्यात ई-व्हेईकल वाहनांना पसंती द्या, असे आवाहन केले होते. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘बेस्ट’सह पालिका प्रशासनाकडून वापरल्या जाणार्‍या गाड्या इलेक्टि्रक प्रकारच्या करण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. पालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात चार्जिंग स्टेशनची गरज लागणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे थिएटर, मॉल आणि पार्किंग लॉटच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी काही संस्थांकडून प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे याबाबत अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in