पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा पुरस्कार २०२२

वातावरणातील झटपट बदल ' हे २१ व्या शतकातील मोठे आव्हान ; पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा पुरस्कार २०२२ सोहळ्यात मुंबई महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादर यांचे प्रतिपादन
पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा पुरस्कार २०२२

गणेशोत्सव म्हणजे मराठी अस्मिता, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. पण अशा या मंगलमय उत्सवाला प्रदूषणाचे गालबोट लागू नये यासाठी जागरूकता म्हणून मुंबई महापालिका, फ्री प्रेस जर्नल - नवशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने "पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा" आयोजित करण्यात येते. यंदाचे या स्पर्धेचे ३ रे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या स्पर्धेत हजारो स्पर्धकानी सहभाग घेतला यामध्ये २१ स्पर्धकांनी मुख्य विजेत्याचा किताब पटकावला. तर जुन्या गिरगावच्या विशेष पर्यावरणपूरक कलाकृतीसाठी मन रेळे या स्पर्धकाला गौरवण्यात आले.        

पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज असून मागील काही वर्षांपासून याला एक चळवळीचे स्वरूप आले आहे. आज ही चळवळ केवळ महाराष्ट्रातील प्रमुख शहरात नाही तर खेडोपाडी पसरलेली आहे. वातावरणातील होणारा बदल आणि त्याचे दुष्परिणाम यामुळे निसर्गाचा होत चाललेला नाश लक्षात घेत लोकांच्या मानसिकतेत बदल होत चालला आहे. कागदाच्या लगद्यापासून तसेच शाडूचा मूर्ती स्थापना करत आज नागरिक आपली पर्यावरणपूरक जबाबदारी पार पाडत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे यनी सांगितले. याचवेळी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असून पर्यावरणाचा विनाश होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले. यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे तिसऱ्या वर्षाची सुरुवात रंगरेझ म्युझिक बँड यांच्या मंत्रमुग्ध संगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पर्यावरणाला हातभार लावत उत्सव साजरे करणाऱ्या घरगुती, सार्वजनिक मंडळांचा प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हे स्पर्धक विविध क्षेत्रात उच्चस्थानी असलेल्या मान्यवरांकडून निवडण्यात आले. यामध्ये मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेअभिनेत्री मुग्धा गोडसे , संजय भुस्कुटे, राजीव मिश्रा या परीक्षकांचा समावेश आहे. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादर, जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजीव मिश्रा, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे, फ्री प्रेस जर्नलचे संचालक अभिषेक कर्णानी, नवशक्तीचे संपादक संजय मलमे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पर्यावरणपूरक उत्सवासाठी फ्री प्रेस जर्नल, नवशक्ती वृत्तपत्राची विशेष धडपड 

पर्यावरणपूरक उत्सव लोकांना समजणे आवश्यक असून त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्याचा निखळ उद्देश मनी ठेवत मुंबई महापालिका आणि नवशक्ती, फ्री प्रेस जर्नल संयुक्तपणे कार्य करत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे उपायुक्त बिरादर यांनी सांगत असेच समाजप्रबोधन एकत्रितरित्या करत पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.  

पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुरस्कार २०२२ विजेतेघरगुती गणेशोत्सव :- प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कमसचिन साळुंखे  शुभम वनमाला  सिद्धेश सुरंगेरामकृष्ण सावंतझलक नाकीरपरिंद मोदी सुधाकर अंबोलकरभाव्या वलेराज्योती सिंगशशिकांत पाटीलश्रावण घोडके गिरीश रूद्र शिवानी मजुमदारप्रदीप पेडणेकर प्रतिक्षा काळे - युवराज काळे

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ :- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, लोअर परेलरुस्तमजी गणेशोत्सव मंडळबाळकृष्ण गणेशोत्सव मंडळ, अंधेरी शिवगणेश उत्सव मंदिर, अंधेरीगिरगावचा राजा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in