आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

मुंबईतील नौदल गोदीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने संवेदनशील ठिकाणांचे सुमारे ९० व्हिडीओ चित्रित केले असून, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित संशयित व्यक्तींसोबत समूह कॉलमध्ये सहभागी झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.
आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा
आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : मुंबईतील नौदल गोदीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने संवेदनशील ठिकाणांचे सुमारे ९० व्हिडीओ चित्रित केले असून, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित संशयित व्यक्तींसोबत समूह कॉलमध्ये सहभागी झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.

बंटी रामप्रकाश मीना असे आरोपीचे नाव असून, तो कुलाबा येथील बधवार पार्क परिसरात राहतो. हेरगिरीच्या आरोपाखाली त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिता, अधिकृत गुपिते कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘नट्टू३’ इन्स्टाग्राम खात्याशी संपर्क

आरोपीचा ‘नट्टू३’ या इन्स्टाग्राम खात्याशी तसेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून चालविल्या जात असल्याचा संशय असलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकाशी संपर्क आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोठडी अर्जात म्हटले आहे.

संशयित गुप्तचरांसोबत समूह कॉल

नौदल गोदीतील संवेदनशील सुविधांचे व्हिडीओ चित्रित करून त्याने संशयित गुप्तचरांसोबत समूह कॉल केल्याचा आरोप आहे. जहाज दुरुस्ती कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून काही व्यक्तींनी नौदल गोदीत येणाऱ्या युद्धनौकांची माहिती मागितल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीचे संपर्क, संवाद, आर्थिक व्यवहार आणि या नेटवर्कमध्ये अन्य व्यक्तींचा सहभाग तपासला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)