मुंबईच्या सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग ; तीन जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मुंबईच्या सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग ; तीन जणांचा मृत्यू

मुंबईच्या सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला आज (२७ ऑगस्ट) आग लागल्याची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या आगीत पाच जण गंभीररित्या भाजले गेल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईतील सांताक्रूझच्या गॅलेक्सी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी १.१७ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यानंतर तात्काळ स्थानिक पोलीस आणि आधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रण करुन आगीवर नियंत्रण मिळवले असून आतापर्यंत सहा जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. तर तीन जणांचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in