Mumbai : मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी संपर्क नाही; ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन’ची माहिती

ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ऑइल टँकरवर (तेलवाहू जहाज) मृत पावलेल्या तीन भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ (एफएसयूआय) ने गुरुवारी दिली.
Mumbai : मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी संपर्क नाही; ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन’ची माहिती
Mumbai : मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी संपर्क नाही; ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन’ची माहिती(Photo- ANI)
Published on

मुंबई : ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ऑइल टँकरवर (तेलवाहू जहाज) मृत पावलेल्या तीन भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ (एफएसयूआय) ने गुरुवारी दिली.

आम्हाला या खलाशांबद्दल सविस्तर माहिती लवकरच मिळेल, असे संघटनेचे सरचिटणीस मनोज यादव यांनी सांगितले.

कथित नियमांचे किंवा निर्देशांचे पालन न केल्यामुळे या जहाजाच्या इंजिन रूमवर अचूक मारा करणारी दारुगोळा डागण्यात आली. यामुळे जहाजावर भीषण आग लागली. जहाजाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून, घटनेचे सविस्तर तपशील अद्याप मिळू शकलेले नाही.

ओमानकडून माहितीची प्रतीक्षा

आम्ही अद्याप मृत खलाशांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकलेलो नाही. आम्ही अजूनही ओमानकडून काही अधिकृत माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत, असे संघटनेच्या सरचिटणीसांनी सांगितले.

  • घटना - ऑइल टँकरवर अमेरिकेचा लष्करी हल्ला आणि आग

  • जहाजाचे नाव - एमटी सेटबेलो (पलाऊ देशाचा ध्वज असलेले)

  • घटनेचे ठिकाण - ओमान किनारपट्टीजवळील ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’

  • एकूण क्रू मेंबर्स - २८ (यात २४ भारतीयांचा समावेश)

  • जीवितहानी - ३ भारतीय खलाशांचा मृत्यू

  • मृत खलाशी - हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील

अमेरिकेच्या नौदलाला या जहाजावर कोणत्या देशाचे नागरिक आहेत याची कल्पना असावी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आतापर्यंत अनेक विधाने आली आहेत. परंतु या विधानाचा खलाशांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही फायदा होणार नाही.

मनोज यादव, सरचिटणीस, एफएसयूआय

logo
marathi.freepressjournal.in